कोरोना लढ्यात इंदुरीकरांनी जपली सामाजिक बांधिलकी; दिला एक लाखांचा निधी

कोरोना लढ्यात इंदुरीकरांनी जपली सामाजिक बांधिलकी; दिला एक लाखांचा निधी

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस थैमान घालताना दिसत आहे. या भयावह कोरोना लढ्यात काही लोकांचा जीव देखील गेला तर काही या आजाराने बाधित देखील झाले आहे. कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्य सरकारने सर्वच क्षेत्रातील लोकांना होईल तेवढी मदत करा, असे आवाहन देखील केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील मंडळींसह प्रसिद्ध मराठी किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनीदेखील कोरोनाविरोधात लढ्यात सामाजिक बांधिलकी जपत हातभार लावला आहे.

इंदुरीकर महाराजांनी या कोरोना लढा आणि कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. इंदुरीकर महाराजांनी बुधवारी संगमनेर तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे एक लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करत कोरोना सहायता निधीत त्यांनी आपल्याकडील १ लाख रूपये दिले आहेत.


अत्यावश्यक सेवा देणार्‍या २ लाख 73 हजार कर्मचार्‍यांचा 25 लाखांचा विमा

अनेकदा इंदुरीकर महाराजांनी आपत्तीच्या वेळी आपला हातभार लावत असतात. कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुराच्या वेळी इंदुरीकर महाराजांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संगमनेर येथे मदतीचा चेक सुपूर्द केला होता. तसेच बुधवारी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम आणि गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे ही एक लाखांचा निधी सुपूर्द केला आहे. कोरोना विरूद्ध लढण्यासाठी राज्य सरकारला त्यांनी एक लाखाची मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

First Published on: April 1, 2020 2:28 PM
Exit mobile version