कल्याणमध्ये सेनेचे टेन्शन वाढले; तर डोंबिवलीत भाजप प्रचारापासून लांब

कल्याणमध्ये सेनेचे टेन्शन वाढले; तर डोंबिवलीत भाजप प्रचारापासून लांब

खासदार निधीतून झाली कल्याण मतदारसंघातील विकास कामे

कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणुकीला अवघा आठवडा शिल्लक आहे. मात्र शिवसेना भाजपमधील आलबेलपणा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र डोंबिवलीत भाजपची मंडळी प्रचारापासून लांब असल्याने, शिवसेनेची मंडळीच प्रचार करताना दिसत आहेत. सेनेकडून एकाकी प्रचार आणि भाजपचे असहकार यामुळे कल्याणात शिवसेनेचे टेन्शन वाढलं आहे.

पाटील यांना शिवसेनेचा विरोध कायम

भिवंडीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना शिवसेनेचा विरोध कायम असल्याने सेनेतील मंडळी त्यांच्या प्रचारात फारशी सहभागी झालेली नाहीत. त्यामुळे डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक कल्याणात जाऊन पाटील यांचा प्रचार करत आहेत. कल्याणमध्ये शिवसेनेचे डॉ. शिंदे हे उमेदवार आहेत. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. मात्र भाजपचे नगरसेवक पदाधिकारी हे कल्याणात पाटील यांच्या प्रचारासाठी गेल्याने डोंबिवलीत शिंदे यांच्या प्रचारात भाजपची मंडळी दिसून येत नाहीत. तसेच डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून फोनही केले जात नाही. तसेच शिंदे यांचे परिचय पत्रकही भाजप कार्यालयात पोहचेली नाही.

शिंदेंसाठी ठाण्यातील शिवसैनिकांची फौज

शिवसेनेकडून भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकत्यांना विचारले जात नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी सेनेच्या प्रचारात फारसी दिसून येत नाहीत. महायुतीचा उमेदवार असतानाही डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात शिवसैनिक तसेच महिला आघाडीचे कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत. डोंबिवलीतील नगरसेवक कल्याणात प्रचारात असल्याने शिवसेनेनेही ठाण्यातील शिवसैनिकांची फौज उतरवली आहे. ठाण्यातील काही नगरसेवक, पदाधिकारी हे डोंबिवलीत शिवसैनिकांच्या बरोबरीने प्रचार करताना दिसत आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सलोख्याचे संबध आहेत. त्यामुळे सेना भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे एकमेकांना सहकार्य मिळण्यासाठी शिंदे आणि चव्हाण दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करत आहेत. येत्या २९ एप्रिलला निवडणुका आहेत. प्रचारासाठी अवघा आठवडा शिल्लक आहे. मात्र सेनेच्या प्रचारातही फारसा रंग चढला नसल्याचे दिसून येत आहे.

First Published on: April 21, 2019 6:50 PM
Exit mobile version