Lok Sabha : पीयूष गोयल यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन; उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

Lok Sabha : पीयूष गोयल यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन; उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

piyush goyal

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पहिल्या टप्प्यातील मतदाना शुक्रवारी (19 एप्रिल) रोजी पार पडले. मात्र सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना अद्यापही दिसत आहेत. खासकरून काँग्रेस नेते भाजपा उमेदवारांकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार करून त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करताना दिसत आहेत. नितीन गडकरी यांच्यानंतर आता उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसचे सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024 Violation of Code of Conduct Piyush Goyal Congress)

पीयूष गोयल यांनी श्रीरामाचे मोठे होर्डिंग लावले असून या होर्डिंगमध्ये वाराणसी मतदारसंघाचे भाजपा उमेदवार नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे. मोग्रा मेट्रो स्टेशनच्या बाहेर होर्डिंग लावले आहे. हा प्रकार धर्माच्या आधारावर आणि धार्मिक चिन्हांचा वापर करून मतदारांना आवाहन करणारा असून यातून आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करण्यात आले आहे. याची दखल घेत पीयूष गोयल आणि मोदींवर तत्काळ कारवाई करावी, तसेच पीयूष गोयल यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : गडचिरोलीत 111 वर्षांच्या फुलमती सरकार यांनी बजावला मतदानाचा अधिकार

सुरेशचंद्र राजहंस यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, निवडणुकीत धर्माच्या आधारावर मतदारांवर प्रभाव टाकणे हे आचारसंहितेचा भंग करणारे आहे. परंतु भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी रामाचे होर्डिंग लावून धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची गंभीर दखल घेऊन गोयल व मोदी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.

बॅनरवर काय? (What’s on the banner?)

दरम्यान, श्रीराम नवमी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोग्रा मेट्रो स्टेशनच्या बाहेर बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांनी रामाला आणले आहे आपण त्यांना आणूया. बॅनरवर नरेंद्र मोदी अयोध्येतील श्रीरामच्या मूर्तीसमोर पुजा करताना दिसत आहेत. तर बॅनरच्या खालच्या बाजूला पीयूष गोयल यांचा फोटा आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : वाढता वाढता वाढे… सांगलीच्या खासदाराची संपत्ती 5 वर्षांत 29 कोटींनी वाढली

नितीन गडकरी यांच्याकडूनही आचारसंहितेचा भंग (Violation of code of conduct by Nitin Gadkari too)

दरम्यान, नितीन गडकरी यांच्याकडूनही प्रचार मोहिमेदरम्यान, धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरून त्यांनी निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केले होते. भाजपा आणि  नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणूक आयोगाने तत्काळ त्यांची उमेदवारी रद्द करून भाजपावर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी, अशी मागणी  प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात केली होती.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 20, 2024 4:26 PM
Exit mobile version