घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : गडचिरोलीत 111 वर्षांच्या फुलमती सरकार यांनी बजावला मतदानाचा...

Lok Sabha 2024 : गडचिरोलीत 111 वर्षांच्या फुलमती सरकार यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Subscribe

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 111 वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या आजींनी गृह मतदानाची सुविधा नाकारत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

गडचिरोली : लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी (19 एप्रिल) मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात 21 राज्यात एकूण 102 जागांसाठी मतदान पार पडले. मात्र महाराष्ट्रातील गडचिरोली-चिमूर मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघात 111 वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या आजींनी गृह मतदानाची सुविधा नाकारत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आजीच्या मतदानाचा उत्साह सर्वांसाठी आदर्शवत ठरताना दिसला. (Lok Sabha Election 2024 The 111 year old Phulmati sarkar exercised its right to vote in Gadchiroli)

लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी होत मतदानासाठी बाहेर निघत होते. यातच तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत या 111 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1913 रोजीचा आहे. नातवाच्या दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अमेठीप्रमाणेच वायनाडसुद्धा सोडतील, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

फुलमती सरकार यांनी स्वतः मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी घेतलेला पुढाकार इतर मतदारांपुढे एक आदर्शवत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. तर अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी आदित्य जीवने यांनी फुलमती आजीचे अभिनंदन करून मतदान प्रक्रियेत नोंदवलेल्या सहभागाबद्दल आभार मानले आहेत.

- Advertisement -

भारत निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यांदाच 85 वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. याचपार्श्वभूमीवर 10 ते 11 एप्रिल या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र काही मतदारांनी प्रत्यक्ष केंद्रावरच मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्या मतदारांनी शुक्रवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याचे पाहायला मिळाले. . त्यात फुलमती बिनोद सरकार या आजींचाही समावेश होता.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : वाढता वाढता वाढे… सांगलीच्या खासदाराची संपत्ती 5 वर्षांत 29 कोटींनी वाढली

फुलमती सरकार यांनी 18 जानेवारी 2022 रोजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही गोविंदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले होते. त्यावेळी त्यांचे वय 109 वर्षं होते. त्यांनी युवा पिढीला मतदानासाठी पुढे येण्याचे देखील आवाहन केले होते.

नागरिकांचा विरोध असतानाही कोविडची लस घेतली

दरम्यान, देशावर कोरोना महामारीचे संकट असताना सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांनी विरोध केला होता. मात्र फुलमती सरकार या आजींनी लसीकरणातही पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले होते. इतकचं नाही त्यांनी स्वतः लस घेत लसीकरणासाठी सर्वांना पुढे येण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा – Lok Sabha election 2024 : निवडणूक ड्युटीवरील ३२ हजार कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान ; यांचे मत कुणाला ?

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -