CoronaVirus: मुंबईसह या पाच शहरांमुळे केंद्र सरकारची वाढली चिंता!

CoronaVirus: मुंबईसह या पाच शहरांमुळे केंद्र सरकारची वाढली चिंता!

CoronaVirus:...म्हणून मुंबईत ५० हजार रुग्णांसाठी क्वारंटाईनची व्यवस्था

मुंबई, इंदूर आणि जयपूर सारख्या पाच मेट्रो सिटी शहरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी असून रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारसाठी मोठी चिंतेचीबाब झाली आहे. या शहरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या १० दिवसांमध्ये या शहरांमध्ये कंटेनमेंट झोनची संख्या जवळपास दुप्पट केली असून युद्धपातळीवर चाचण्या सुरू केल्या आहे. मात्र अनेक ठिकाणी चाचणी करण्यासाठी पुरेशी सुविधा नाही आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय पातळीवर रिकव्हर होण्याचे प्रमाण १९ टक्क्यांहून अधिक आहे. परंतु मुंबई, अहमदाबाद, इंदूर आणि जयपुर मध्ये कोरोनाचे रुग्णांचे रिकव्हर होण्याचे प्रमाण कमी आहे. जयपुर आणि इंदूरमध्ये रिकव्हर होणाचे प्रमाण ८ टक्क्यांहून कमी आहे. तर अहमदाबादचे प्रमाण १० टक्के आहे. शिवाय मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांच्या संख्या सर्वाधिक असून रिकव्हर होण्याचे प्रमाण १३ टक्के आहे. यामध्ये दिल्लीत सर्वात जास्त चांगले रिकव्हर होण्याचे प्रमाण आहे. दिल्लीत २८ टक्के रिकव्हर होण्याचे प्रमाण आहे. पुणे, इंदूर, अहमदाबाद आणि मुंबईतील मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, शहरात मृत्यूचे प्रमाण हे रिकव्हरी पेक्षा जास्त असणे म्हणजे तिथे कोरोनाग्रस्त रुग्णांची उशीरा ओळख पटली जात आहे. यामुळे संसर्गात वाढ होत आहे. परिणामी रुग्णांला रिकव्हर होण्यासाठी जास्त वेळ लागतो नाहीतर त्याचा मृत्यू होतो. पुढे ते म्हणाले की, राज्यांना कंटेनमेंट झोनवर अधिक भर देऊन रॅपिट अँडी बॉडी टेस्ट करा आणि संक्रमित लोकांची लवकर ओळख पटवण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना दिल्या आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

गेल्या दिवसांत इंदूरने कंटेनमेंट झोनची संख्या दुप्पट करून १७० पेक्षा अधिक केली आहे. जयपुरमध्ये देखील कंटेनमेंट झोनची संख्या जास्त आहे. संपूर्ण पुण्याला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलं आहे. दिल्लीमध्ये कंटेनमेंट झोनची संख्या ८७ आहे.


हेही वाचा – इराणने अवकाशात सोडला आपला पहिला लष्करी उपग्रह!


 

First Published on: April 23, 2020 8:26 AM
Exit mobile version