पाच वर्षात आयटी विभाागाला ३५५ कोटींचा निधी, राऊतांनी खोटं बोलण सोडाव – रवींद्र चव्हाण

पाच वर्षात आयटी विभाागाला ३५५ कोटींचा निधी, राऊतांनी खोटं बोलण सोडाव – रवींद्र चव्हाण

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेल्या महाआयटी घोटाळ्याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होते. पण याच प्रकरणात आता संजय राऊत यांच्यावर बुमरॅंग होण्याची चिन्हे आहेत. फडणवीस सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी या आयटीच्या घोटाळ्यावर मोठा खुलासा केला आहे. संजय राऊतांनी माहिती घेऊन बोलावे, तसेच खरे बोलावे असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने २५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पण आयटी घोटाळ्याच्या मुद्द्यावर आता भाजपमधून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. राज्य सरकारने आयटी विभागाला दिलेला निधी पाहता, संजय राऊतांनी सांगितलेला आकडा दूर दूरवर मेळ खाणारा नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी माहिती घेऊनच या प्रकरणात बोलायला हवे. तसेच खोट बोलून माहिती देण्याचे टाळणे गरजेचे असल्याचा सल्ला भाजपकडून देण्यातआ आला आहे. आपल महानगरने आयटी विभागाला दिलेल्या कामाचा लेखाजोखा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये फडणवीसांच्या काळात ७०२ कोटींच्या निविदा तर ठाकरेंच्या काळात ३१३४ कोटींची कामे आयटी विभागाला दिल्याचे समोर आले आहे.

भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या दाव्यानुसार आयटी विभागाला भाजप सरकारकडून ३५५ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता. तर या पाच वर्षात ७२४ कोटींची कामे देण्यात आली होती. या दोन्हीच्या एकत्रीकरणानंतरही १ हजार १०० कोटींची कामे आयटी विभागाला देण्यात आल्याचा दावा चव्हाण यांनी केला. त्यामुळे २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात तथ्य आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे बजेट जेव्हा ३५५ कोटी असते तेव्हा २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच बोलायला हवे. तसेच खोटं बोलणे सोडून द्यायला हवे असाही सल्ला रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.


 

First Published on: February 18, 2022 4:40 PM
Exit mobile version