आंदोलनादरम्यानही महानंदाकडे पुरेसा दूधसाठा

आंदोलनादरम्यानही महानंदाकडे पुरेसा दूधसाठा

प्रातिनिधिक फोटो

राज्यात शेतकरी संघटनेचे आंदोलन दुधाच्या दरावरून पेटले आहे. आंदोलनामुळे मुबंईच्या दिशेने येणार दुधाचे टँकर थांबवण्यात आले आहे. पण मुबंईतील महानंदाच्या गोरेगाव यूनिट मध्ये साडेसहा लाख लिटर दुधाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. महानंदाकडे उपलब्ध असलेला साठ्याने पूर्ण मुंबईला ३ दिवस दूध पुरेल अशी माहिती महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम मंगळे यांनी दिली आहे. महानंदा गोरेगाव मुंबई यूनिट मधून दररोज दोन ते अडीच लाख लिटर दूध वितरीत केले जाते. आंदोलनादरम्यान काल महानंदाच्या गोरेगावयेथील डेरीत २३ दुधाचे टँकर आले आहेत. कालपर्यंत दूधचा साठा नियामित सुरु असून आज दुध पूरवले जाईल का या बद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अशा परिस्थीत लोकांना दुध मिळाव याची सोय महानंदाकडून करण्यात आली आहे. महानंदाने केलेल्या साठ्यामुळे ३ दिवस पुरेल इतके दुध लोकांना उपलब्ध होईल. त्यामुळे आंदोलना दरम्यान काही काळ तर लोकांना दुध मिळू शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलन सुरु असतांना दुधाचा तुतवडा पडू नये याची काळजी म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. साठलेल्या दुधाचा साठा संपला तरीही कृत्रिम दुध लोकांना मिळण्याची सोयही महानंदाकडून करण्यात आली आहे. साठा संपल्यानंतर ही १३०.०५ मेट्रिक टन दुधाची भुकटी ग्राहकांसाठी उपलब्ध करू असं महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम मंगळे यांनी सांगितले. मुंबईतील एकूण महानंदाच्या केंद्रांमध्ये दररोज अडीच ते पावने तीन लाख लीटर दूध विक्री केल्या जाते.

डेअरीतील दुधाचा स्टॉक
मुंबई केंद्रावर साडेसहा लाख लीटर दुधाचा स्टॉक ठेवण्यात येतो तर पुणे केंद्रावर ५२ हजार लीटरचा स्टॉक आहे. वैभववाडी केंद्रावर ५४ हजार लिटरचा स्टॉक आहे. नागपुर केंद्रावर साडेबारा हजार लीटरचा स्टॉक आहे. लातूर केंद्रावर तेवीस हजार लीटरचा स्टॉक उपलब्ध आहे. महानंदची सर्व केंद्र मिळून एकूण सात लाख ८६ हजार लीटर स्टॉक उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: July 16, 2018 10:20 PM
Exit mobile version