Maharashtra Budget 2021: बजेट म्हणजे काय रे भाऊ, जाणून घ्या बजेटबद्दल अधिक माहिती

Maharashtra Budget 2021: बजेट म्हणजे काय रे भाऊ, जाणून घ्या बजेटबद्दल अधिक माहिती

Maharashtra Budget 2021: बजेट म्हणजे काय रे भाऊ, जाणून घ्या बजेटबद्दल अधिक माहिती

राज्यात मागील ७ दिवसांपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक योजना आणि विकास कामांवर चर्चा करण्यात आली परंतु अर्थसंकल्प म्हणजेच बजेट म्हणजे काय? हा बजेट कसा तयार केला जातो? कोण तयार करतं आणि या बजेटचा महाराष्ट्राला कसा फायदा होणार आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत. राज्यात मागील वर्षांपासून कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोना संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमिवर यावर्षी अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प विधानसभेत सादर करतील.

बजेट म्हणजे काय?

राज्यातील विकासकामांवर खर्च करण्यासाठी तसेच वर्षभरातील खर्चाचे आणि पैसा जमा करण्याचे आर्थिक नियोजन मांडणे म्हणजेच बजेट आहे. यामध्ये राज्यातील विकासकामांवर केला जाणारा खर्च, पेट्रोल-डिझेलच्या दरांवरील कर, व्याज, तसेच राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा यावर नियोजन केले जाते. राज्यातील तिजोरीतला पैसा कुठे आणि कसा खर्च केला जणार हे सांगणारे नियोजन असते.

बजेट कसा तयार केला जातो?

राज्यात अगामी वर्षात कोणत्या योजना राबविल्या जात आहेत. विकासकामांवर किती खर्च होणार, कोणकोणत्या योजनांना निधीची तरतूद केली जाणार आहे. तसेच राज्याच्या तिजोरीत किती रक्कम येणार आहे किंवा किती रक्कम आहे यावर हा बजेट तयार केला जातो. यामध्ये कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न होतो.

बजेटमध्ये काय काय असते?

बजेट तयार करताना राज्यातील सर्वच घटकांचा विचार केला जातो. बजेटमध्ये सर्व क्षेत्रातील आर्थिक तरतूद केली जाते. राज्याच्या आणि नागरिकांच्या हिताच्या अनेक नव्या योजना जाहीर करण्यात येतात. राज्यातील ग्रामीण भागाला उभारी देण्यासाठी कृषी क्षेत्राला उभारी मिळण्यासाठी कृषी संबंधित मोठ्या घोषणा केल्या जातात. राज्यातील संरक्षण, लघुउद्योग, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, बँकिंग आणि फायनान्स, स्टार्टअप्स,कॅपिटल आणि मार्केट्स अशा सगळ्या गोष्टींचा विचार या बजेटमध्ये केला जातो.


हेही वाचा : Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर भर देणार?


बजेट कोण सादर करणार?

राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अर्थसंकल्प विधानसभेत सादर करतील तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधानपरिषदेत बजेट सादर करतील. राज्याचे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभाग तयार करते. हा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करतात. ८ मार्च २०२१ रोजी दुपारी २ वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जाईल.

राज्य सरकारला कुठून मिळतो महसूल?

इन्कम टॅक्स
कॉर्पोरेट टॅक्स
जीएसटी
एक्साईज ड्युटी
निर्गुंतवणूक
खासगीकरण
वीज, फोन,गॅस बिलांमधील कर
लायसन्स फी
राज्य सरकारकडील कर्जावरचं व्याज
रेडिओ आणि पुलांवरचा टोल
पासपोर्ट-व्हिसा फी
सरकारी कंपन्यांतील नफ्याचा हिस्सा
आरबीआयकडील निधी

अशा सर्व गोष्टींमधून राज्य सरकारला उत्पन्न मिळतं असते. विधानसभेत मांडण्यात येणारा अर्थसंकल्प ३१ मार्चच्या आधी मंजूर व्हावा लागतो तसेच १ एप्रिलपासून हा बजेट अंमलात आणला जातो.

 

First Published on: March 8, 2021 12:30 PM
Exit mobile version