घरमहाराष्ट्रMaharashtra Budget 2021: अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर भर देणार?

Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर भर देणार?

Subscribe

राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज सादर होणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनामुळे आरोग्य क्षेत्राची स्थिती समोर आली. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष घोषणा केल्या जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य क्षेत्राची स्थिती सर्वांच्या समोर आली. त्यामुळे ही स्थिती सुधारण्यासाठी विशेष घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसंच सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सरकार नवीन काही घोषणा करेल का, याकडेही लक्ष लागून आहे.

- Advertisement -

५ मार्च २०२१ ला अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यातून राज्याच्या सध्याची आर्थिक स्थिती ढासळल्याचं चित्र समोर आलं. कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला असून एकटे कृषी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात घट असल्याची आर्थिक पाहणी अवलातून स्पष्ट झालं. राज्याच्या स्थूल उत्पन्नात १ लाख ५६ हजार ९२५ कोटींची घट दर्शवण्यात आली आहे. यामुळे राज्यासमोर आर्थिक अडचण असून विकास कामांना त्यामुळे कात्री लावावी लागली आहे.


हेही वाचा – Maharashtra Budget 2021: राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळणार?


Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -