27 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; 9 मार्चला मांडला जाणार अर्थसंकल्प

विधानभवन

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या 27 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. तर 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेच्या पदरी काय पडणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

राज्य विधीमंडळात ९ मार्चला दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. तर आदल्या दिवशी 8 मार्चला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. अद्याप राज्य मंत्रिमंडळाच्या रचनेत राज्यमंत्री पद कोणाला देण्यात आलं नाही. त्यामुळे अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होत वित्त खात्यासाठी राज्यमंत्री नेमला जाईल का? तसेच विधान परिषदेत अर्थसंकल्प कोण सादर करणार असे प्रश्न अनुत्तरित आहेत.

देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज्याचे अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहे. यापूर्वी फडणवीसांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी पद भूषवली आहेत. मात्र राज्याचा अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे फडणवीस अर्थमंत्री म्हणून जनतेसाठी काय नवीन घेऊन येतात याकडे सर्वांच लक्ष आहे. कारण फडणवीस आमदार असताना त्यांनी अर्थंसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक लिहिलं आहे. तर अर्थसंकल्प या विषयावरही त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पातून लोकांना काय अपेक्षित आहे याबाबत फडणवीसांनी लोकांकडूनचं सुचना मागवल्या आहेत.

यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई, ठाणे, नागपूर महापालिकेसह अन्य महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्वा प्राप्त झालं आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून शेतकरी, आरोग्य, कृषी, सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


‘ते 16 आमदार अपात्र ठरतील’ उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे ‘ही’ मागणी

First Published on: February 8, 2023 3:04 PM
Exit mobile version