राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष मिटवण्यासाठी मातोश्रीवर डिनर?

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष मिटवण्यासाठी मातोश्रीवर डिनर?

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष मिटवण्यासाठी मातोश्रीवर डिनर

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्याकरता गेले होते. यावेळी कौटुंबिक स्नेह भोजनही देखील झालं. गेले दोन महिने राज्यात जे सत्ताकारणाचं राजकारण सुरू होतं त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेना यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचं दिसून आलं होतं. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळीही राज्यपालांनी अनेक मंत्री शपथ घेत असताना नियमांवर बोट ठेवत आक्षेप घेतला होता. काँग्रेसचे मंत्री के.सी पाडवी यांना शपथ परत घ्यायला लावली होती. त्यामुळे पुढील काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पहायला मिळणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण गुरुवारी अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्नेह भोजनासाठी थेट मातोश्रीवरच दाखल झाले. त्यामुळे येत्या काळात राज्यात स्थिर सरकार चालवण्यासाठी राज्यपाल आणि सरकार यांच्यात चांगले संबंध निर्माण करण्यासाठी गुरुवारच्या स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

First Published on: January 2, 2020 10:17 PM
Exit mobile version