मुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये भीषण आग; ७ गोदाम जाळून खाक

मुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये भीषण आग; ७ गोदाम जाळून खाक

मुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये भीषण आग

मुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ७ गोडाऊन जळून खाक झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे अग्नीशमन दलाच्या ३ गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. यावेळी घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. सदरची आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

नेमके काय घडले?

मुंब्रा शिळफाटा खान कंपाउंड येथे असलेल्या गोडाऊनला अचानक सोमवारी आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये प्लास्टिक आणि भंगाराची सात गोडाऊन जळून खाक झाली आहेत. या आगीची माहिती मिळताच प्रथम शिळ अग्निशमन केंद्राची फायर इंजिन तसेच मुंब्रा अग्निशमन केंद्राकडील फायर इंजिन आणि टँकरच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम सुरु केले. मात्र, प्लास्टिक आणि भंगाराच्या गोदामे असल्याने आगीने उग्र स्वरूप धारण केल्यानंतर अग्निशमन दलाने अतिरिक्त कुमुक बाळकुम अग्निशमन केंद्राची मदत मागविण्यात आली. पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये जाळून खाक झालेल्या गोदामात समशेर खान यांचे प्लास्टिकचे आणि भंगाराचे गोदाम जळाले आहे. तर अहमद अली यांचे चिंध्यांचे गोदाम, मोहम्मद अक्रम शाह यांचे गोदाम, रफिक अहमद यांचे भंगाराचे आणि पुठ्याचे गोदाम या आगीत जाळून खाक झाले आहे. मात्र, अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, शिळफाटा येथील गोदामात वारंवार लागणाऱ्या आगीने या गोदामाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – लिव्ह इन पार्टनरला जिवंत जाळले; नराधमाला जन्मठेप


 

First Published on: January 7, 2020 8:23 PM
Exit mobile version