घरताज्या घडामोडीलिव्ह इन पार्टनरला जिवंत जाळले; नराधमाला जन्मठेप

लिव्ह इन पार्टनरला जिवंत जाळले; नराधमाला जन्मठेप

Subscribe

लिव्ह-इन-पार्टनर म्हणून राहणाऱ्या महिलेला या नराधमाने मद्यधुंद अवस्थेत जाळले. याप्रकरणी मंगळवारी अंतिम सुनावणी मुख्य जिल्हा न्यायालयात झाली.

लिव्ह-इन-पार्टनर म्हणून सोबत राहणाऱ्या महिलेला मद्यधुंद अवस्थेत रॉकेल टाकून जिवंत जाळले. याप्रकरणी न्यायालय समोर सादर साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरीत मुख्य जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एम. जोशी यांनी रामाश्रय पाल याला दोषी ठरविले. आरोपी रामाश्रय पाल (वय ३०) रा. कळवा याला जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा सोमवारी ठोठावली. या खटल्यात सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी सरकारच्या वतीने काम पहिले.

नक्की काय घडले?

आरोपी रामाश्रय पाल हा मृत महिलेसोबत लिव्ह-इन-पार्टनर म्हणून सोबत राहत होता. तर मृत महिला ही विवाहित होती. तिला चार आपत्य होते. तिचा नवरा हा दारूच्या नशेच्या आहारी गेलेला होता. यालाच कंटाळून त्या महिलेने घर सोडले. सहा महिन्यांपूर्वी ती ठाण्याच्या जयभीम नगरमध्ये राहण्यास गेली होती. तरीही तिचा नवरा हा तिला सातत्याने त्रास देत होता. ती भंगार वेचक होती. काही कालांतराने तिचा संपर्क भंगाराच्या व्यवसायातून आरोपी रामाश्रय ऊर्फ राजू याच्याशी आला. दोघेही लिव्ह-इन-पार्टनर म्हणून राहत होते. ६ जून रोजी आरोपी राजू हा मद्यधुंद होऊन घरी आला आणि आपल्या पार्टनर महिलेसोबत शुल्क गोष्टीवरून भांडणे करू लागला. नशेच्या अंमलाखाली असलेल्या राजू याने महिला पार्टनरला रागाच्या भरात शिवीगाळी देत तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत पेटवून दिले. आगीच्या दाहकतेने मृतक महिलेने आरडा ओरडा केला तो ऐकून आसपासचे रहिवाशी धावून आले. त्याचवेळी रामाश्रय उर्फ राजू याने पार्टनर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिला ही ७० टक्के भाजली होती. रुग्णालयात दोन दिवसाने तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

सदर खटल्याची अंतिम सुनावणी मुख्य जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जोशी यांच्या न्यायलयात सुरू होती. या खटल्यात सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी न्यायलयात मृतकाची मृत्युपूर्व जबानी आणि वैद्यकीय आवाहल सादर केला. न्यायालयासमोर आलेले पुरावे शिक्षेस सबळ असल्याचा निर्वाळा देत न्यायमूर्ती जोशी यांनी मंगळवारी निकाल दिला. या निकालात आरोपी रामाश्रय उर्फ राजू याला भादवी ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि १ हजाराचा दंड ठोठावला.


हेही वाचा – धक्कादायक! सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आईनेही दिली साथ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -