मुलाचे आमिष दाखवत भोंदू बाबाने केला बलात्कार

मुलाचे आमिष दाखवत भोंदू बाबाने केला बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

३७ वर्षीय महिलेवर अनेकदा बलात्कार करणाऱ्या बाबाला विरार पोलिसांनी अटक केली आहे. सुदृढ बालक मिळवून देतो असे सांगून या बाबने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप या महिलेनी केला आहे. पीडित महिलेला मागील अनेक वर्षापासून मुल नव्हते. यापूर्वीही तिने बाळाला जन्म दिला होता मात्र जन्मापूर्वीच तिच्या बाळाचा मृत्यू झाला. पीडित महिलेनी या समस्येवर स्त्री रोगतज्ञांकडूनही उपचार घेतले होते. मात्र मुल न झाल्याने पीडित महिला मानसिक तणावात होती. याचाच फायदा घेत एका बाबाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीला बलात्काराच्या गुन्हाअंतर्गत अटक केली असल्याची माहिती विरार पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला आणि तिचा पती विरार येथेच राहतात. महिलेचा पती एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे तर पीडित महिला ही गृहिणी आहे. महिलेचे लग्न झाल्यानंतर अनेकदा गर्भपात करण्यात आला होता. अनेक प्रयत्न करूनही मुल होत नाही म्हणून २०११ मध्ये पतीने तिला एका बाबाकडे नेले. आरोपी बाबाने या दाम्पत्यासाठी पूजा केली. पूजा करूनही मुल न झाल्याने या दम्पत्याने बाबाकडे जाणे बंद केले. मात्र मागील वर्षी मुल होण्यासाठी पीडित महिला पून्हा बाबाकडे गेली होती. मे २०१७ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान या महिलेवर १२ वेळा बलात्कार करण्यात आला असल्याचा आरोप महिलेने केले आहे.

महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बाबाला अटक करण्यात आली. आरोपी बाबाला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली- पोलीस निरिक्षक घनश्याम भाव

First Published on: November 19, 2018 10:49 AM
Exit mobile version