गाडीवर आमदार असलेल्याचा स्टिकर; पोलिसांनी थांबवले तर…

गाडीवर आमदार असलेल्याचा स्टिकर; पोलिसांनी थांबवले तर…

गाडीवर आमदार असलेल्याचा स्टिकर; पोलिसांनी थांबवले आणि...!

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन असतानाही काही लोक लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडण्यासाठी काहीना काही शक्कल लढवत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना मुंबईच्या महेश्वरी उद्यान येथे घडली आहे. एक व्यक्ती गाडीवर आमदार असलेल्याचा स्टिकर लावून गाडी चालवत असल्याची घटना उघडकीस आली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये सध्या लॉकडाऊन असल्याने सर्व गाड्यांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा आमदार असलेल्या स्टिकरची गाडी आज सायंकाळच्या सुमारास महेश्वरी उद्यान या ठिकाणी आली. पोलिसांनी या गाडीस थांबण्यास सांगितले आणि त्या व्यक्तीकडे विचारणा केली असता ती व्यक्ती आमदार नसून गाडीवर आमदार असल्याचा स्टिकर लावून फिरत असल्याचे उघडकीस आले. या आरोपीचे नाव कमलेश शाह (५४) असून या व्यक्तीसह त्याच्या लहान मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची पोलिसांनी आरोपीकडे विचारणा केली असता आपण व्यावसायिक असून सध्या लॉकडाऊनमध्ये कंटाळाला आला होतो, म्हणून बाहेर फिरायला आलो असल्याचे आरोपींनी सांगितले.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा निर्णय आता दिल्ली दरबारी


 

First Published on: April 30, 2020 10:31 PM
Exit mobile version