मनसुख यांना देण्यात आलेला क्लोरोफार्म आहे तरी काय ?

मनसुख यांना देण्यात आलेला क्लोरोफार्म आहे तरी काय ?

मनसुख यांना देण्यात आलेला क्लोरोफार्म आहे तरी काय ?

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणांमध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. एटीएसने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मनसुख यांना हत्येआधी क्लोरोफार्म देण्यात आले होते.
पण हे क्लोरोफार्म नक्की आहे तरी काय ते जाणून घेऊया.

क्लोरोफार्म हा एक रंगहीन सुगंधित तरळ रासायनिक द्रव्य आहे.

पूर्वी शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला बेशुद्ध करण्यासाठी क्लोरोफॉर्म वापरले जायचे.

पण आता याच्या वैद्यकिय वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

क्लोरोफॉर्मचा वापर आता रसायने आणि साबण बनवण्यासाठी केला जातो.

इथेनॉल आणि क्लोरीनवर रासायनिक प्रक्रीया केल्यानंतर क्लोरोफॉर्म तयार होते.

क्लोरोफॉर्मच्या सतत संपर्कात आल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात.

वैद्यकिय विश्वात १८४७ साली सर्वप्रथम क्लोरॉफॉर्मचा वापर सुरू झाला. पण रुग्णांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने क्लोरोफॉर्मच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

त्यानंतर विसाव्या शतकात क्लोरोफॉर्मच्या जागी इतर औषधांचा वापर करण्यात आला.

क्लोरोफॉर्मच्या दुष्परिणामांमुळे शरीरावरची त्वचा निघणे, डाग पडणे असे साईड इफेक्टस होऊ लागले.

त्याचबरोबर , किडनी आणि हृदयावरदेखील क्लोरोफॉर्मचा विपरित परिणाम होत असल्याने क्लोरोफॉर्मचा वापर बंद करण्यात आला आहे.

पण छुप्या मार्केटमधून क्लोरोफॉर्मची विक्री होत आहे.

क्लोरोफॉर्म पाण्यात सहज मिसळले जाते.


 

First Published on: March 26, 2021 2:47 PM
Exit mobile version