मुंब्र्यात विवाहितेची हत्या की आत्महत्या?

मुंब्र्यात विवाहितेची हत्या की आत्महत्या?

विवाहित असल्याचे लपवून १९ वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह केल्याचे बिंग फुटल्याची घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. जुबेर सय्यद, असे या विवाहिताचे नाव आहे. जुबेर यांनी पहिल्या पत्नीसह दुसऱ्या पत्नीला एकत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला दुसऱ्या पत्नीने विरोध केल्याने तिला मारहाण करण्यात आली. मात्र, मारहाणीनंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. या प्रकरणाची मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ही हत्या की आत्महत्या? असा संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे असून याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नेमके काय घडले?

ठाणे येथील कुलसुम बिल्डिंग, ४ था माळा बॉम्बे कॉलनी, मुंब्रा येथे राहणारा जुबेर सय्यद यांनी ७ आक्टोबर रोजी महेक हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र, त्याने आपले पूर्वी लग्न झाल्याचे महेक आणि तिच्या पालकांशी लपविले होते. मात्र, एका महिन्यातच जुबेरचे बिंग फुटले. पहिल्या बायकोचे प्रकरण माहित पडल्यानंतर जुबेर नशेच्या अधीन होऊन महेकला बेदम मारहाण करू लागला. महेकच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. असाच वाद पुन्हा एकदा बुधवारी रात्री घडला.

या वादात त्यांनी महेकला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी महेक ही मृतावस्थेत आढळली. तात्काळ महेकला टिळक छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महेक हिने तिच्या वडिलांना आणि आईला फोन करून जुबेरच्या मारहाणीबाबत सांगितले होते. तसेच पहिल्या पत्नीसोबत एकत्र राहण्याला विरोध करत मला नाही राहायचे घरी घेऊन चला अशी गळ घातली होती. मात्र, जरा सबुरीने घे अशी समजूत महेकच्या घरच्यांनी काढली. मात्र, गुरुवारी सकाळीच महेकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याहची खबर तिचे वडील रफिक शेख यांना देण्यात आली असल्याची माहिती शेख यांनी दिली आहे. महेकच्या तोंडातून आणि डोक्यातून रक्त वाहिल्याने आणि गळ्याभोवती निशाण आढळल्याने ही हत्या कि आत्महत्या? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर महेकचे वडील रफिक शेख मात्र, हत्या केल्याचा आरोप करीत आहे. या प्रकरणाचा सखोल तपस करावा अशी मागणी केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या संभ्रमामुळे पोलीस हत्या की आत्महत्या या निष्कर्षावर शवविच्छेदनाच्या आवाहलानंतरच स्पष्ट होईल अशी सूत्रांची माहिती आहे.


हेही वाचा – ठाण्यात खाडी किनारी मातीचा भराव; अनधिकृत चाळी खारफूटीच्या मुळावर


 

First Published on: November 7, 2019 9:06 PM
Exit mobile version