Bhandup Fire : भांडुपच्या ड्रीम मॉलला भीषण आग, अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी

Bhandup Fire :  भांडुपच्या ड्रीम मॉलला भीषण आग, अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी

Bhandup Fire : भांडुपच्या ड्रीम मॉलला भीषण आग, अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी

 Bhandup Fire : मुंबईतील भांडूप येथील ड्रीम मॉलला भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आग मोठी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या आधी देखील २५ मार्च २०२१ ला ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. यात आगीत९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा एक वर्षानंतर या मॉलमध्ये आग लागली आहे.  आग लागली तेव्हा मॉलमध्ये कोणीही नव्हते त्यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला लागलच्या कोविड वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा मॉल पूर्णपणे बंद करण्यात आला. मागच्या वर्षी झालेल्या अग्नितांडवात पालिकेने केलेल्या तपासात मॉल प्रशासनाला जबाबदार ठरवण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने मॉलमधील वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची शिफारस केली होती. मात्र तरीही आज पुन्हा या मॉलमध्ये आग लागली आहे.

तिथल्या स्थनिक नागरिकांनी हा मॉल शापित असल्याचे म्हटले आहे. मॉल तयार झाल्यापासून मागच्या १० वर्षात मॉल रिकामी आहे. HDIL ने हा मॉल बनवला होता आणि त्याचे प्रमोटर पीएमसी घोटाळ्यात अडकले आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. दोन वर्षांपूर्वीही या मॉलमध्ये आग लागली होती त्यानंतर मॉलमध्ये आगीचे सत्र सुरू आहे. मॉलमध्ये केवळ मल्टिप्लेक्स आणि एक हॉस्पिटल सुरू आहे. त्याचप्रमाणे काही बेकायदेशीर कंपन्याचे ऑफिस मॉलमध्ये असल्याचे तिथले रहिवाशी सांगतात.


हेही वाचा –  पालिकेच्या मॉकड्रिलमध्ये गेटवे ऑफ इंडिया येथे बॉम्बस्फोट

First Published on: March 4, 2022 9:55 PM
Exit mobile version