घरताज्या घडामोडीपालिकेच्या मॉकड्रिलमध्ये गेटवे ऑफ इंडिया येथे बॉम्बस्फोट

पालिकेच्या मॉकड्रिलमध्ये गेटवे ऑफ इंडिया येथे बॉम्बस्फोट

Subscribe

जगात रशिया आणि युक्रेन यांच्यातील भीषण युद्ध सुरू असताना आणि मुंबईला दहशतवाद्यांचा धोका असताना शांत असलेल्या मुंबई शहरात गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी शुक्रवारी दुपारच्या सुमारास ‘बॉम्ब स्फोट’ होऊन त्यात अनेकजण जखमी झाल्याचा कॉलने मुंबई महापालिका आपत्कालीन विभाग हादरला. सुदैवाने घटनास्थळी अग्निशमन दल तात्काळ मदतीला पोहोचले. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब डिटेक्शन स्कॉड आदी यंत्रणा तात्काळ दाखल झाल्या आणि त्यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य करून जखमींना रुग्णालयात नेले. मात्र ही सर्व घटना जवळून पाहणाऱ्या तेथील नागरिकांना नंतर या घटनेचा उलगडा झाला की, हे तर पालिकेचे ‘आपत्कालीन मॉकड्रिल’ होते हुश्श आणि घटनेपूर्वी टेन्शनमध्ये असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

वास्तविक, मुंबईत यापूर्वी १९९२ मध्ये बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या असून त्यात अनेकजण जखमी आणि अनेकांचा मृत्यूही झाला. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानी अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी २००८ मध्ये सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि गेट वे ऑफ इंडिया समोरील हॉटेल ताजवर दहशतवादी हल्ला चढवला होता. आता पुन्हा एकदा मुंबई शहर हे दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहे. अशा दहशतवादी संघटनांकडून अचानक बॉम्ब हल्ला, गोळीबार झाल्यास नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, अशा घटनांचा मुकाबला कसा काय करावा, जखमींना कशी काय मदत करावी, याबाबत नागरिकांना माहिती व्हावी व त्यांच्यात जागृती यावी, आय उद्देशाने शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पालिका आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल, पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी एक आपत्कालीन मॉकड्रिल घेण्यात आले. बॉम्ब स्फोट झाल्याची कृत्रिम घटना घडवून आणून त्यावेळी जखमींना कशी मदत करावी याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी, मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यास व बॉम्ब स्फोटसारखी घटना घडल्यास नागरिकांनी अलर्ट राहून व घाबरून न जाता जखमींना मदत करावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले. याप्रसंगी पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व पालिका अधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट! २४ तासांत ७८ नव्या रुग्णांची वाढ, तर एकही मृत्यूची नोंद नाही

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -