मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

संग्रहित छायाचित्र

रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. (Mega Block On Central and Harbor Railway Line On Sunday)

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

ठाणे स्थानकाच्या पुढील जलद लोकल मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच, निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचणार आहेत. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. तसेच, वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


हेही वाचा – शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे जाहीर

First Published on: September 30, 2022 7:24 PM
Exit mobile version