रविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

रविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

रविवारी २४ जुलै रोजी, तांत्रिक कामांमुळे मुंबई लोकलच्या पनवेल ते वाशीदरम्यान आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आणि सांताक्रुझ ते गोरेगावगरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पनवेल ते वाशीदरम्यान रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. ज्यामुळे रविवारी सकाळी १०.३३ पासून दुपारी ३.८९ वाजेपर्यंतच्या पनवेलहून सीएसएमटीला जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून पनवेल, बेलापूरला जाणाऱ्या लोकल रविवारी सकाळी ९.४५ ते ३.१२ पर्यंत लोकल सेवा रद्द करण्यात येतील. शिवाय ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बरवरील दोन्ही मार्गावरील लोकल सेवा सुद्धा रद्द करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवरील भायखळा ते माटुंगादरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर शनिवारी रात्रीपासून मेगा ब्लॉक घेऊन काम करण्यात येणार आहे. सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.०५ वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १२.४० ते पहाटे ५.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

बेलापूर ते खारकोपर आणि नेरूळ ते खारकोपर ही लोकल सेवा सुरू असेल. तसेच सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालू असणार आहेत. ठाणे ते वाशी, नेरूळ ट्रान्स हार्बर सेवा सुद्धा सुरळीत असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यानच्या जलद मार्गावरील लोकल धिम्या गतीने धावतील.

बेलापूर ते खारकोपर आणि नेरूळ ते खारकोपर ही लोकल सेवा सुरू असेल. तसेच सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालू असणार आहेत. ठाणे ते वाशी, नेरूळ ट्रान्स हार्बर सेवा सुद्धा सुरळीत असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यांमुळे सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यानच्या जलद मार्गावरील लोकल धिम्या गतीने धावतील.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर रात्री ११.३० पासून मेगा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे भायखळा ते माटुंगादरम्यान लोकल ट्रेन धिम्या गतीने धावतील.


हेही वाचा :मुंबई लवकरच खड्डेमुक्त होणार, नव्या तंत्रज्ञानांची चाचपणी

First Published on: July 23, 2022 10:05 AM
Exit mobile version