local mega block: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

रविवार सुट्टीच्या (Sunday Holiday) दिवशी घराबाहेर पडण्याचा प्लॅन करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रेल्वेच्या (Railway) तिन्ही मार्गावर रविवारी 29 मे रोजी मेगाब्लॉक (Mega Block) घोषिक करण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. रेल्वेकडून मेगा ब्लॉकचे वेळापत्रक (Mega Block Time Table) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवली दरम्यान 14 तासांचा रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी आणि पोईसर पुल संख्या नंबर 61 च्या री-गर्डरींग दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार, शनिवारी – रविवारी कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी दुपारी 1:30 वाजेपर्यत असणार आहे.

या ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा बोरीवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तर डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा अंधेरी ते बोरिवली स्थानकाच्या 5 व्या मार्गिकांवर चालविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रविवारी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत मध्य रेल्वेच्या (Central Railway) सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10:48 ते दुपारी 3.49 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या रेल्वेगाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.

या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धिम्या डाउन मार्गावर वळवण्यात येतील. शिवाय, घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर डाउन मार्गावर सकाळी 11:40 ते संध्याकाळी 4:40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 11:16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि सीएसएमटी येथून सकाळी 10:48 ते सायंकाळी 4:43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील (Harbor Railway) सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9:53 ते दुपारी 3:20 पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10:45 ते सायंकाळी 5:13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. प्रवाशांचा सोयीसाठी ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.


हेही वाचा – उद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, संभाजीराजेंचा थेट आरोप

First Published on: May 28, 2022 7:59 AM
Exit mobile version