शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला मेगाब्लॉकचा अडथळा

शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला मेगाब्लॉकचा अडथळा

Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देणार कानमंत्र

मुंबई । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रविवार, १७ नोव्हेंबर रोजी ७वी पुण्यतिथी आहे. या दिवशी राज्यातील कानाकोपर्‍यातून शिवसैनिक दादर, शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र या वेळी रेल्वेने यंदाच्या रविवारी तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेतल्याने हजारो शिवसैनिकांची यामुळे प्रचंड गैरसोय होणार आहेे. लोकलगाड्या बंद राहिल्यामुळे शिवसैनिकांना येता येणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला मेगाब्लॉकचा अडथळा शिवसेना दूर करणार का, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीला जावून महाशिवआघाडीबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून त्वरित शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत परतणार आहेत.

कुर्ला स्थानकातील जुना पादचारी पूल हटविण्यासाठी शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३०या वेळेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्याही या मार्गावरून थांबवल्या जाणार आहेत. तसेच रविवारी मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप जलद लोकल अप धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे लोकल आणि मेल, एक्सप्रेस 20 ते 25 मिनिटे उशिराने धावणार आहे. तसेच हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-बेलापूर/पनवेल या दोन्ही अप-डाऊन मार्गावरील लोकलसेवा बंद असणार.

ट्रान्स हार्बरवरील ठाणे- पनवेल -ठाणे आणि पनवेल- अंधेरी आणि खारकोपर ते नेरुळ या मागार्र्वरील लोकलबंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी- वाशी आणि ट्रान्स हार्बरवरून ठाणे- वाशी /नेरुळ या मार्गावरून स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणाम डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार. या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा स्थानकात थांबणार नाही, तर लोअर परळ आणि माहीम स्थानकात लोकल दोन वेळा थांबणार आहे.

First Published on: November 16, 2019 6:25 AM
Exit mobile version