एसटीला राखी बांधून एसटीच्या संरक्षणाचा आगळा-वेगळा संदेश

एसटीला राखी बांधून एसटीच्या संरक्षणाचा आगळा-वेगळा संदेश

आगारामध्ये केले रक्षाबंधन साजरे

आज रक्षाबंधन, अर्थात बहिण-भावाच्या नात्याचा हळवा क्षण. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची या दिवशी आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र याच रक्षाबंधणाच्या निमित्ताने एसटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एक आगळा-वेगळा संदेश दिला आहे. आंदोलनं, मोर्चे म्हटलं की आंदलनकर्ते किंवा मोर्चेकऱ्यांच्या रडारवर नेहमीच एसटी असते. नुकत्याच झालेल्या मराठा ठोक मोर्चामध्ये देखील आंदोलन कर्त्यांनी दगडफेड, चाळपोळ करून एसटीचे लाखोंचे नुकसान केले आहे. आधीच डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाला यामुळे फटका बसला होता. मात्र आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने एसटीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी एसटीला राखी बांधत एसटीच्या संरक्षणाचा आगळा-वेगळा संदेश दिला आहे. यावेळी प्रवाशांना देखील एसटीने प्रवास करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी आगार वरीष्ठ व्यवस्थापक सुनील पवार, श्रीरंग बरगे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

एसटी आगारात रक्षाबंधन साजरा

जसे पोलिस बांधव वर्षांचे १२ ही महिने सण असो किंवा काहीही असो आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतात. रक्षाबंधनाच्या दिवशीदेखील आपल्या कर्तव्यात कसूर न करता सर्व कर्मचारी आपले हे कर्तव्य बजावत आहेत. यामुळेच परिवहन दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून मुंबई सेट्रल आगारात महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकारी पुरूष कर्मचाऱ्यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरी केली. दररोज एकमेकांसोबत काम करत असताना होणाऱ्या तक्रारी, किरकोळ भांडणं विसरून यानिमित्ताने सर्व कर्मचारी एकत्र आलो आणि त्यानिमित्ताने एक चांगले प्रेमाचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने शनिवार आणि रविवारी महाड(२), स्वारगेट (११) कराड (२) आणि साताऱ्याला ६ जादा गाड्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने सोडण्यात आल्या होत्या.

First Published on: August 26, 2018 4:20 PM
Exit mobile version