नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवाला कोरोनाची लागण!

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवाला कोरोनाची लागण!

राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यापूर्वी खासगी सचिवाने ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले आहे.

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ठाण्यात सोमवारी १ हजार ७०० कोरोना रुग्णांची वाढ झाली तर ३५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५७ हजार ४वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ५६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या भेटीला थोरातांनंतर पवारही!


 

First Published on: July 14, 2020 2:13 PM
Exit mobile version