Corona : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोरोना पॉझिटिव्ह

Corona : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे पणन व अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी सिल्लोड सोयगांव मतदारसंघातून 25 हजार नागरिकांना नेण्याचं उद्धिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी अब्दुल सत्तार यांनी तब्बल दोनशे बस बुक केल्या आहेत.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. दरम्यान, ते घरीच उपचार घेत आहेत. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारनंतर सत्तार हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. काल शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचादेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला होता. आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दौरा केला आहे. यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले होते.

यापूर्वीही राज्यातील काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान यांनाही कोरोना झाला होता. काहींनी कोरोनावर मात केली असून काही नेते अजूनही उपचार घेत आहेत. या दरम्यान, आता अब्दुल सत्तार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा –

दिल्लीत कोरोनाचा आलेख वाढता! एकूण बाधितांचा आकडा १ लाख २५ हजारांवर…

First Published on: July 21, 2020 9:42 PM
Exit mobile version