घरदेश-विदेशदिल्लीत कोरोनाचा आलेख वाढता! एकूण बाधितांचा आकडा १ लाख २५ हजारांवर...

दिल्लीत कोरोनाचा आलेख वाढता! एकूण बाधितांचा आकडा १ लाख २५ हजारांवर…

Subscribe

दिल्ली शहरात मंगळवारी, १२०० लोकांनी कोरोनाला पराभूत करून ते यशस्वी झाले आहेत, तर २७ लोकं मरण पावले आहेत

देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग अद्याप वाढताना दिसत आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत ५३ दिवसानंतर १००० पेक्षा कमी रूग्ण आढळून आले असल्याने अशी अपेक्षा होती की दिल्लीची परिस्थिती आता बर्‍याच प्रमाणात नियंत्रणात आहे. मात्र आज पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने सध्या परिस्थिती पुन्हा गंभीर असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी दिल्ली शहरात कोरोनाचे १ हजार ३४९ नवीन रुग्ण आढळल्याने पुन्हा दिल्लीत कोरोना बाधितांचा वाढता आलेख दिसून येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, नवीन रुग्ण आढल्यानंतर राज्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढून १ लाख २५ हजार ९६ झाली आहे. या रुग्णांपैकी १ लाख ६ हजार ११८ लोक बरे झाले आहेत, तर आतापर्यंत ३ हजार ६९० लोकांचा मृत्यू झाला आहे.  दिल्ली शहरात मंगळवारी, १२०० लोकांनी कोरोनाला पराभूत करून ते यशस्वी झाले आहेत, तर २७ लोकं मरण पावले. दिल्ली सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार दिल्ली शहरातील कोविड हॉस्पिटलमधील कोरोना रूग्णांसाठी अजूनही ११ हजार ९५८ बेड रिक्त आहेत. तर दिल्लीत एकूण ७ हजार ३१८ कोविड केअर सेंटर असून कोविड हेल्थ सेंटरमध्ये ३९४ लोकं कोरोना संक्रमित आहेत. सध्या दिल्लीमध्ये ८ हजार १२६ लोकं होम आयसोलेशनमध्ये आहेत.

तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३६९ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २४६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख २७ हजार ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ७ हजार १८८ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८२ हजार २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.७२ % एवढे झाले आहे.


Coronavirus Mumbai: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद; ६२ मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -