कोरोनाच्या नावाने नागरिकांची लूट; मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत पकडले बोगस मार्शल!

कोरोनाच्या नावाने नागरिकांची लूट; मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत पकडले बोगस मार्शल!

पालिकेकडून कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कचरा आणि घाण होऊ नये यासाठी स्वच्छता मार्शल नेमण्यात आले आहेत. या स्वच्छता मार्शलकडून कोरोनाच्या नावाने लूट होत असल्याचा आरोप होत असल्याने आज मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी थेट स्टेशन परिसरात जाऊन या मार्शला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी ३ जणांच्या विरोधात तक्रार नोंद केली असून तक्रारी नुसार पोलिसांनी एक व्यक्तीला अटक करून इतर दोन साथीदारांचा शोध घेत असल्याचे सांगितले जात आहे.

कोविडच्या नावे नागरिकांची लूट

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात नेमण्यात आलेल्या मार्शलकडून कोविडच्या नावे लूट सुरू होती. या प्रकरणी मार्शल्सला मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कुठलेही आदेश दिले नसल्याचा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला होता. तरी देखील नागरिकांची लूट सुरूच असल्याचे दिसते.

रंगेहाथ पकडून बोगस मार्शल पोलिसांच्या ताब्यात

हे मार्शल बोगस असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. यावरूनच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी पाहणी करत असताना एका मार्शलला पैसे वसूल करत असताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जात आहे. या मार्शल्सला पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि कचरा करणे यासाठी यांची नेमणूक केली आहे. पण हे मार्शल लोकांकडून घनकचरा विभागाच्या पावत्या देऊन किंवा बिना पावती ५०० ते १००० रुपयांची लूट करत असल्याचा आरोप त्यावर आहे. तर पालिकेकडून १०० रुपये इतका दंड वसुली केली जात असताना हे मार्शल प्रवाश्यांकडून ५०० रुपयांपर्यंत दंड वसूल करत होते. दंड वसूल केल्यानंतर हे मार्शल त्यांना कुठलीही पावती देत नसल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून १ आरोपीला अटक केली आहे. दोन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळतेय.


…म्हणून आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचा आदेश
First Published on: September 26, 2020 6:50 PM
Exit mobile version