घरदेश-विदेश...म्हणून आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचा आदेश

…म्हणून आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचा आदेश

Subscribe

आफ्रिकन स्वाइन फिव्हर मुळे राज्यात १८ हजार डुकरांचा मृत्यू

ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत आफ्रिकन स्वाईन फिव्हरने प्रभावित झालेल्या भागामधील १२ हजार डुकरांना ठार मारण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिले आहे. तसेच आसामच्या पोल्ट्री क्षेत्रात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर आता आफ्रिकन स्वाइन फिव्हर मुळे राज्यात १८ हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे. पहिला एएसएफ प्रकरण मे महिन्यात समोर आले होते. तर सरकारची आकडेवारी चुकीची आहे, कारण या रोगामुळे १ लाखाहून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. आजारावर कोणतीही लस नाही आणि त्याचा मृत्यू दर ९० ते १०० टक्के आहे, असे डुक्कर फार्मच्या मालकांचे म्हणणे आहे.

यामुळे सुमारे १८ हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे. सोनोवाल यांनी दुर्गा पूजा उत्सवापूर्वी १२ हजार संक्रमित डुकरांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. प्रोटोकॉलनुसार मृत डुकरांच्या नमुन्यांची तपासणी एका भागात केली जाईल आणि एएसएफची लागण झाल्याची खात्री झाल्यास त्याभोवती सुमारे एक किमी एपिकेंटर (उपकेंद्र) परिसर म्हणून घोषित केला जाईल. मग त्या भागातील सर्व डुकरांना शिक्का मारून ठार मारण्यात येईल, असे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त सचिव श्याम जगन्नाथन यांनी मे महिन्यापासून केलेल्या अंदाजांचा हवाला देत सांगितले.

- Advertisement -

आसाममध्ये डुक्करांची संख्या सर्वाधिक

मिळालेल्या माहितीनुसार, एपिकेंटर केंद्राच्या बाहेरील १ किमी क्षेत्राला सर्विलांस झोन आणि त्यानंतर ९ किमीचा बफर झोन असे म्हणतात. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ३३ एपिकेंटर आहेत. शेजारच्या राज्यांमधून आसाममध्ये होणाऱ्या डुकरांच्या आयातीवर बंदी घातली आहे. २०१९ च्या पशुगणनेनुसार आसाममध्ये डुक्करांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात सुमारे २१ लाख डुक्कर आहेत.


शिर्डी साईसंस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -