राज ठाकरेंची उत्तर भारतीय नेत्यांशी चर्चा! काय झालं चर्चेत?

राज ठाकरेंची उत्तर भारतीय नेत्यांशी चर्चा! काय झालं चर्चेत?

राज ठाकरेंनी घेतली उत्तर भारतीय नेत्यांची भेट

उत्तर भारतीयांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणा किंवा स्वत: अध्यक्ष राज ठाकरे यांची काय भूमिका आहे हे आख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. उत्तर भारतीयांमुळे इथल्या भूमिपुत्रांना त्रास सहन करावा लागत असल्याची भूमिका कायमच मनसेने मांडली आहे. अनेकदा या भूमिकेसाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेकदा हिंसक कारवायाही केल्या आहेत. मात्र, आता याच परप्रांतीयांना मुंबईत काय त्रास सहन करावा लागतो, यावर चर्चा करण्यासाठी उत्तर भारतीय महापंचायतच्या काही नेत्यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राज ठाकरेंना संवाद सभेचं आमंत्रण!

येत्या २ डिसेंबरला उत्तर भारतीय महापंचायतीने एका संवाद सभेचं आयोजन केलं आहे. या संवाद सभेसाठी राज ठाकरेंना मुख्य मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. हे आमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं असून त्यांनी सभेला येण्याचं मान्य केल्याचा दावा महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी केला आहे. मात्र, राज ठाकरेंनी यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचं मनसेच्या अंतर्गत सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये होत असलेल्या वादामुळे दोन्हीकडच्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दोन्ही गटांमधले गैरसमज मिटावेत आणि वादावर तोडगा निघावा यासाठी या संवाद सभेचं आयोजन करण्यात आल्याचं विनय दुबे यांनी सांगितलं आहे.

(अधिक माहिती प्रतिक्षेत)


तुम्ही हे वाचलंत का? – मुंबई महानगर पालिकेत मनसेला प्रवेशबंदी, पत्रकार परिषद घेण्यापासून रोखलं!

First Published on: October 12, 2018 3:21 PM
Exit mobile version