घरमनोरंजन'साजिदने मला कपडे काढायला लावले'

‘साजिदने मला कपडे काढायला लावले’

Subscribe

रिचेलने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिच्यावर घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. ती यात लिहिते की, सलोनी चोपडा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण 'हमशकल्स' सिनेमा दरम्यान मला माझ्या एजंसीने साजिद खानकडे जाण्यासाठी सांगितले. एजंसी मला सांगण्याच्या ५ मिनिटाच्या आत मला साजिदने फोन केला. त्यांनी मला त्यांच्या इस्कॉन जुहू येथील घरी बोलावले आणि...

#MeToo चळवळीने देशभरातील अनेकांना हादरवून सोडले आहे. अनेक सेलिब्रिटी आपल्यावर लैंगिक शोषण झाल्याचे सोशल मीडियावरुन सांगत आहेत. अनेक बड्या आसमींची नावे यातून पुढे येत आहे. आता दिग्दर्शक, निर्माता साजिद खानचाही समावेश या यादीमध्ये झाला आहे. साजिदने मला कपडे काढायला लावले, असा खळबळजनक आरोप अभिनेत्री रिचल व्हाईट हिने केला आहे. २०१४ साली आलेल्या ‘उंगली’ या सिनेमात रिचल इमरान हाश्मीसोबत दिसली होती.

वाचा- #metoo सुभाष घई आणि पियूष मिश्रा यांच्यावरही आरोप

नेमकं प्रकरण काय?

रिचेलने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिच्यावर घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. ती यात लिहिते की, सलोनी चोपडा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण ‘हमशकल्स’ सिनेमा दरम्यान मला माझ्या एजंसीने साजिद खानकडे जाण्यासाठी सांगितले. एजंसी मला सांगण्याच्या ५ मिनिटाच्या आत मला साजिदने फोन केला. त्यांनी मला त्यांच्या इस्कॉन जुहू येथील घरी बोलावले. मी साजिदला घरी भेटणे योग्य वाटत नाही, असे देखील सांगितले. पण त्याने मी माझ्या आईसोबत राहतो ती पण असेल तू येऊ शकतेस असे सांगितले. त्याच्या घरी गेल्यावर त्याची मोलकरीण मला ड्राईंग रुममध्ये घेऊन गेली आणि तिथून पुढे बेडरुममध्ये. त्यानंतर रिचल लिहिते की, त्यावेळी मी पांढरा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. साजिद मला अत्यंत वाईट नजरेने पाहत होता. साजिद त्यावेळी व्यायाम करत होता. साजिद माझ्या छातीकडे पाहून बोलत होता. सिनेमात तुला बिकीनी घालायची आहे. असे सांगून त्याने मला माझे कपडे काढायला लावले. या रोलसाठी तिने मी बिकिनीमधील ऑडिशन देईन पण ऑफिसमध्ये बेडरुममध्ये नाही, असे तिने सांगितले.

- Advertisement -
वाचा- #MeToo : ‘सलमान खाननं माझा लैंगिक छळ केला’

साजिदवर यांंनीही केले लैंगिक अत्याचाराचे आरोप

साजिद खानवर या आधीही लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत. गुरुवारी पत्रकार करिश्मा उपाध्यायने साजिदवर आरोप करत एका इंटरव्ह्यू दरम्यान साजिदने माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर अभिनेत्री सलोनी चोप्राने देखील साजिदवर आरोप केला आहे. त्याच्यासोबत एका सिनेमाला असिस्ट करत असताना साजिदने काही महिने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला, असे तिने म्हटले आहे.

पाहा-
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -