शिवसेनेला पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही; गजानन काळेंचा घणाघात

शिवसेनेला पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही; गजानन काळेंचा घणाघात

संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर राजकीय प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. यात मनसे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

याट्विटमध्ये छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, अशी टीका मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

हेही वाचा – मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, संभाजीराजेंची माघार

संभाजी राजे यांची निवडणुकीतून माघार –

राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे संभारी राजे यांनी म्हटले आहे. मी राज्यसभा निवडणूक लढवत नसलो, तरी ही माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे. कुणापुढे झुकून मला राज्यसभेची खासदारकी नको आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला-

मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

हेही वाचा – संभाजीराजेंविरोधात भूमिकेनंतर संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर, पक्षाच्या बैठकांना लावणार हजेरी

First Published on: May 27, 2022 1:49 PM
Exit mobile version