Raj Thackeray Grandson : राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं ‘हे’ नाव

Raj Thackeray Grandson : राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं ‘हे’ नाव

Raj Thackeray Grandson : राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं 'हे' नाव

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली यांना अलीकडेच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आज या चिमुकल्याचा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नातवाचे नाव किआन असे ठेवण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी केवळ घरातील काही मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.

5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले. या नव्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी सर्वप्रथम फेसबुक पोस्ट करत दिली होती. तर काही दिवसांपूर्वी बाबा झालेले अमित ठाकरे यांनी आपल्या बाळाची पहिली झलक फेसबुक पोस्टवर शेअर केली होती. दरम्यान राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर नातवाच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता शिवतीर्थ किआन अशी हाक ऐकू येणार आहे.

‘किआन’ हे हिंदू धर्मातील नाव असून या नावाचा अर्थ देवाची कृपा , प्राचीन, राजेशाही असा आहे. दरम्यान राज ठाकरेंना नातू झाल्यानंतर त्याचे नाव काय असणार यावरून सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. मात्र आज अखेरीस अमित ठाकरेंच्या पुत्राचा नामकरण सोहळा पार पडला आहे.

शिवतिर्थावर बारश्याचा सोहळा! राज ठाकरेंच्या नातवाचं ठेवलं ‘हे’ नाव

दरम्यान राज ठाकरे कधी आपल्या नातवासह वेळ घालवताना तर कधी त्याला अंगाखांद्यावर खेळवताना दिसले.
चिमुकल्याचा आगमनापासूनच राज ठाकरेंच्या शिवतिर्थावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतेय. चिमुकल्याच्या आगमनानंतर आजोबा राज ठाकरे आणि त्याच्या पत्नी आजी शर्मिला ठाकरे आनंद व्यक्त केला आहे.


raj thackeray ayodhya visit : चलो अयोध्या! राज ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी, मनसेचं शिष्टमंडळ लवकरचं अयोध्येत

First Published on: May 6, 2022 1:54 PM
Exit mobile version