मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

सौजन्य - गणेश कुरकुंडे

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना शनिवारी स्थानिक न्यायालयात हजार करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अविनाश जाधव आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी दुपारी ठाणे महानगरपालिकेतील कोविड १९ रुग्णालयात सुरु असलेल्या नर्स यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी रुग्णालयात बळजबरीने घुसून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शुक्रवारी दुपारी त्यांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर जाधव यांच्या विरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे. विनापरवानगी एखाद्या वास्तूत बळजबरीने प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अविनाश जाधव यांचा ताबा कापूरबावडी पोलिसाना देण्यात आला. कापूरबावडी पोलिसांनी अविनाश जाधव यांना अटक करून शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जाधव यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा –

मटका किंग जिग्नेश ठक्कर : बालपणीच्या मित्राने आर्थिक वादातून केली हत्या

First Published on: August 1, 2020 9:27 PM
Exit mobile version