कल्याण-डोबिंवलीत मनसेचे शिवसेनेविरोधात पोलखोल आंदोलन

कल्याण-डोबिंवलीत मनसेचे शिवसेनेविरोधात पोलखोल आंदोलन

मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवली येथे केली महाआरती

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी शिवसेनेने आता वज्रमूठ आवळली असतानाच आता मनसेने मात्र सेनेची पोलखोल करण्याचे ठरवले आहे. सकाळी दादरच्या शिवाजी पार्कात शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोस्टरबाजी करण्यात आली आणि आता डोंबिवलीत मनसेने श्रीराम मंदिरात ढोलकी, टाळ-मृदुंगाच्या गजरात महाआरती करुन सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या कामाचा पोलखोल करत अनोखे आंदोलन केले आहे.

हे वाचले का? ‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र खिशात’ – मनसेची पोस्टरबाजी

आता तरी बुद्धी दे

निवडणुकांच्या तोंडावर नेहमीच राम मंदिराचा विषय काढला जातो. लोकांच्या भावनांशी खेळ करण्याच कट सेना- भाज सातत्याने मांडत आली आहे.याटा निषेध म्हणून मनसेने चक्क प्रभू श्रीरामालाच साकडे घातले असल्याचे त्यांनी महानगरला सांगितले. महाआरती करत भावनिक राजकारण करणाऱ्या सरकारला सुबुद्धी द्यावी. मंदिर हा विषय फक्त निवडणूकी पुरता न घेता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूका लढविण्याची बुद्धी मिळावी यासाठी ही महाआरती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा– उद्धव ठाकरेंचा राममंदिरासाठी अयोध्या दौरा 

कल्याण डोंबिबलीची दैन्यावस्था

कल्याण- डोबिंवली क्षेत्रात विकासकामांचे नुसते आश्वासन लोकांना देण्यात आले. पण प्रत्यक्षात येथे नागरी सुविधांची वाताहत आहे. कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार शिवाय महापालिकेतील सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळेच कल्याण डोंबिवलीतील नागरिकांचा २४ वर्षाचा असुविधांचा वनवास संपवण्यासाठी महाआरती करण्यात आली.

First Published on: November 24, 2018 1:45 PM
Exit mobile version