घरदेश-विदेशउद्धव ठाकरे जनसंवादच्या माध्यमातून अयोध्येत भाषण करणार

उद्धव ठाकरे जनसंवादच्या माध्यमातून अयोध्येत भाषण करणार

Subscribe

शिवसेनेला अयोध्येत जाहीर सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली नसली तरी उद्धव ठाकरे मात्र जनसंवादाच्या माध्यमातून भाषण करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियासहित खासगी विमानाने मुंबईहून अयोध्येला रवाना झाले आहेत. दुपारी २ वाजता ते अयोध्येत पोहोचतील. त्यानंतर ते लक्ष्मण किल्ल्यावर जाऊन साधू, संत आणि महंताची भेट घेणार असून त्यांच्याशी जनसंवाद करणार आहेत. हा जनसंवाद करताना उद्धव ठाकरे भाषण देणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेच्या जाहीर सभेला उत्तर प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन परवानगी नाकारली होती. मात्र सभा नसली तरी उद्धव ठाकरे जनसंवादच्या माध्यमातून भाषण करणार आहेत.

MyMahanagar ground report from sarayu river

अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर आज उद्धव ठाकरे आरती करणार आहेत. यानिमित्ताने शरयूच्या तीरावरील महंताशी बातचीत केली आहे आमचे विशेष प्रतिनिधी Hemant Birje..

Posted by My Mahanagar on Friday, 23 November 2018

- Advertisement -

नसंवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीच्या घाटावर पोहोचतील. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शरयू मातेचा आशीर्वाद घेऊन महाआरतीला उपस्थित राहतील. त्यानंतर उद्या अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेऊन पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याचे वेळेपत्रक शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे.

तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे. काहींच्या मते उद्धव ठाकरे यांची कृती राजकारणासाठी आहे, अशी टीका करण्यात आली आहे. तर काहींनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला असून तेच राम मंदिर उभारू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

#Ayodhya #SharyuRiver Mymahanagar Ground report from Sharyu river

काय आहे राम आणि शरयू नदीचे नाते? राम मंदिराच्या उभारणीत शरयू नदीचे महत्त्व काय आहे? शरयू नदीच्या घाटावर महाआरती करुन उद्धव ठाकरे राजकीय लढाईची घोषणा करणार का? पाहा My Mahanagar News विशेष प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Posted by My Mahanagar on Friday, 23 November 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -