भारतीय चित्रपट संग्रहालयाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

भारतीय चित्रपट संग्रहालयाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्धाटन आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयात भारतीय चित्रपटांचा १०० वर्षांचा इतिहास मांडण्यात आला असून कफ परेड येथे उभारलेल्या या संग्रहालयासाठी १०४ कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या देखरेखीखाली हे संग्रहालय बांधण्यात आले आहे.

दुसऱ्या जागतिक युद्धाच्या परिणामाची माहिती संग्रहालयात

‘द न्यू म्युझियम बिल्डिं’मध्ये चार विशाल प्रदर्शन दालने आहेत. तसेच गांधीजी आणि चित्रपट, बालचित्रपट स्टुडिओ, तंत्रज्ञान, सृजनशीलता आणि भारतीय चित्रपट असे चार विभाग करण्यात आले आहेत. या संग्रहालयासाठी लेखक आणि सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ‘इनोव्हेशन कमिटी’ देखील स्थापन करण्यात आली आहे. तसेच दोन इमारतींमध्ये हे संग्रहालय साकारण्यात आले आहे. भारतीय चित्रपट संग्रहालयासाठी लगतच्या गुलशन महल या ऐतिहासिक इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या इमारतीमधील नऊ भागांमध्ये भारतीय चित्रपटाचा उदय, भरातीय मूकपट, बोलपटांचा उदय स्टुडिओंचा काळ, दुसऱ्या जागतिक युद्धाचे परिणाम आदिंची माहिती या संग्रहालयात आहे.


वाचा – ‘म्हणून मी तुला छळतोय’… व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे मोदींना फटकारे


 

First Published on: January 19, 2019 5:06 PM
Exit mobile version