Lockdown effects : दीर्घकाळ होमसिक महिला पुरूषांपेक्षा जास्त सैरभैर

Lockdown effects : दीर्घकाळ होमसिक महिला पुरूषांपेक्षा जास्त सैरभैर

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात भारतीयांचे मानसिक आरोग्य ढासळत गेल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तर मानसिक आजारातून उपचार घेऊन बरे झालेल्या भारतीयांमध्येही हे प्रमाण पुन्हा आढळून आले आहे. तर मानसिक आजारांची वाढ झाल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे. मानसिक आरोग्य बिघडण्यामध्ये प्रामुख्याने नोकरी जाण्याची भीती, तणाव, एकलकोंडेपणा आणि आर्थिक असुरक्षितेत वाढ होणे यासारख्या कारणांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे मानसिक आरोग्यावर उपचार घेणाऱ्यांमध्ये ६८ टक्के इतकी वाढ झाली आहे.

कोरोनामुळे भारतीयांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला आहे हे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून तर समोर आलेच आहे. पण कोरोनाचा कहर सुरू होण्याआधीही भारतीयांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आकड्यात होते. जवळपास १५ कोटी भारतीय मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार घेत होते. त्यापैकी ३ कोटी भारतीयांनाच मानसिक आरोग्यावर उपचार मिळाले असल्याची राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणाची आकडेवारी आहे. पण कोरोनाच्या काळात मात्र वाढलेला लॉकडाऊन, बळजबरीने करण्यात आलेले आयसोलेशन , आर्थिक असुरक्षितता, घरगुती हिंसाचार आणि नोकरीबाबतची वाढणारी चिंता यामुळे मानसिक आरोग्याचे संकटही तितकेच वाढले. कोव्हिड १९ च्या कालावधीत सुसाईड प्रिव्हेंशन इंडिया फाऊंडेशनने बंगळुरू स्थित संस्थेने १५९ मानसिक आरोग्याचे प्रॅक्टीश्नर सोबत मिळून सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातील संशोधनातून आलेल्या निष्कर्षानुसार भारतीय नागरिकांमध्ये आत्महत्या करण्याची भावना येणे, स्वतःच्या शरीराला हानी करून घेणे, मानसिक आजार पुन्हा बळावणे यासारख्या गोष्टी समोर आल्या आहेत.

कोरोनाच्या संकटाने भारतात मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची रिस्क वाढत गेली. या कालावधी अनेक लोक मानसिकदृष्ट्या आणखी आजारी पडत गेले. त्यामध्ये नोकरी जाण्याची चिंता, पैसे न पुरण्याची भावना, आर्थिक असुरक्षितता, कामाचा तणाव, समाजाचा संपर्क न राहणे यासारख्या गोष्टी वाढल्याचे सुसाईड प्रिव्हेंशन इंडिया फाऊंडेशनचे संशोधन सल्लागार नूर मलिक यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे सर्व सामाजिक स्थरांमध्ये आणि विविध वयोगटांमध्ये या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक आरोग्याचा सल्ला घेणाऱ्यांमध्ये १८ वर्षांच्या व्यक्तींपासून ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. सल्ला घेणाऱ्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर तरूणांकडून तसेच वर्कींग प्रोफेशनल्समध्येही मानसिक तणाव वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे असे नूर यांनी स्पष्ट केले. मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतलेल्या जवळपास ४२ टक्के भारतीयांनी आपण आत्महत्या करण्याचा विचार करत होतो असे कबुल केले आहे. तर ३५ टक्के लोकांनी आपण स्वतःला इजा करून घेणार होते अशी माहिती दिली. तर आत्महत्येचा विचार आपल्या मनात आला होता असे कबुल करणाऱ्यांचा टक्का ४८.८ इतका आहे. त्यामुळेच देशात मानसिक आरोग्याच्या सेवांच्या सुविधा वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.


 

 

 

 

 

 

 

 

 

First Published on: September 16, 2020 1:09 PM
Exit mobile version