संजय राऊतांची प्रकृती ठिक; लवकरच मिळणार डिस्चार्ज

संजय राऊतांची प्रकृती ठिक; लवकरच मिळणार डिस्चार्ज

संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस आढळल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर अँन्जियोप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. पण, आता राऊत यांची प्रकृती ठिक असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

शिवाय, संजय राऊत हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना ही काम करत असल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. तसंच, दरदिवशी ट्विट करणाऱ्या संजय राऊत यांनी हॉस्पिटलमधूनही ट्विट केलं आहे. त्यामुळे, शिवसैनिकांना पुन्हा एकदा उभारी आली आहे.

हॉस्पिटलमध्ये अँन्जियोप्लास्टी केल्यानंतरही मंगळवारी सकाळी संजय राऊत काम करताना दिसले. बेडवर बसून त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं आहे. संजय राऊत हे सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. खरंतर त्यांनी रुटीन चेकअप साठीची अपाईंटमेट देखील घेतली होती. पण, सतत घेतल्या जाणाऱ्या बैठकींमुळे संजय राऊत व्यस्त होते. अखेर ते सोमवारी हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर त्यांच्या हृदयात दोन छिद्र असल्याचं सांगण्यात आलं. डॉक्टरांनी तात्काळ अँजिओग्राफी केल्यानंतर अँजियोप्लास्टी केली. त्यानंतर आता त्यांची प्रृकती ठिक आहे. शिवाय, त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल.

दिग्गज नेत्यांनी घेतली राऊतांची भेट

संजय राऊतांची अँजियोप्लास्टी झाल्यानंतर लिलावती हॉस्पिटलमध्ये मोठ-मोठे दिग्गज नेते दाखल होत त्यांनी राऊतांची भेट घेतली. शरद पवार, आशिष शेलार, उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे यांनी ही संजय राऊत यांची भेट घेतली.

हेही वाचा –

ओवेसीचा भाजप, सेनेच्या सत्तेला नकार; मात्र NCP ला पाठिंबा

First Published on: November 12, 2019 2:23 PM
Exit mobile version