तेजसची झळ मुंबईकरांना

तेजसची झळ मुंबईकरांना

महिला रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! IRCTC कडून मिळतेय कॅशबॅक आणि डिस्काऊंटची ऑफर

बहुचर्चित मुंबईची पहिली खासगी ट्रेन मुंबई सेंट्रल -अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ही 17 जानेवारीपासून धावणार आहे. मात्र या खासगी तेजसमुळे पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर धावणार्‍या मेल, एक्स्प्रेस आणि लोकलच्या लाखो प्रवाशांना लेटमार्क लागण्याची चिन्हे आहेत. या मागचे कारण असे की, खासगी तेजस एक्स्प्रेस वेळेत पोहचावी याकरिता अहमदाबाद ते मुंबई दरम्यान खासगी तेजस एक्स्प्रेसही 19 जानेवारीपासून नियमित धावणार आहे. ही तेजस चालविण्यामागच्या उद्देश हे की, प्रवाशांना उत्तम सुविधा देणे आणि गंतव्य स्थळी पोहचविणे आहे. मात्र या खासगी तेजस एक्स्प्रेसच्या शेकडो प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वेला दररोज 21 मेल, एक्स्प्रेस ट्रेन आणि 10 पेक्षा जास्त उपनगरीय लोकल गाड्यांना फटका बसणार आहे. विशेष म्हणजे तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना वेळेत पोहचविण्यासाठी 23 मेल, एक्स्प्रेस ट्रेन आणि लोकल गाड्यांना लूप लाइनवर टाकण्यात येईल. त्यामुळे खासगी तेजस एक्स्प्रेससाठी लाखो प्रवाशांना फटका बसणार आहे. हा फटका जोपर्यंत नवीन वेळापत्रक येत नाही तोपर्यंत पश्चिम रेल्वेच्या लाखो प्रवाशांना लेट मार्क लागण्याचे चिन्ह आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल दरम्यान जेव्हा खासगी तेजस एक्स्प्रेस धावणार तेव्हा अप- डाऊनच्या एकूण 23 मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या मुंबई ते सूरत दरम्यान लेट होणार आहे.

ही माहिती पूर्णत: चुकीची आहे. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणार्‍या खासगी तेजस एक्स्प्रेसमुळे कोणत्याही ट्रेन लेट होणार नाहीत.-रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

First Published on: January 10, 2020 3:58 AM
Exit mobile version