Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक! आज नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक! आज नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण वाढत आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून २ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. १९ मार्चला मुंबईत ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. आज देखील मुंबईत ३ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ३ हजार ७७५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ६२ हजार ६५४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये १ हजार ६४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख २६ हजार ७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईत २३ हजार ४४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के एवढे आहे. २० मार्चपर्यंत ३७ लाख ११ हजार १०३ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत दुप्पटीचा दर १०६ दिवसांचा असून सध्या मुंबईत ४० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तसेच ३१६ सक्रिय सीलबंदी इमारती आहेत.


हेही वाचा – Live Update: नागपुरात आज ३ हजार ६१४ नव्या रुग्णांची नोंद, ३२ जणांचा मृत्यू


 

First Published on: March 21, 2021 8:09 PM
Exit mobile version