Mumbai Corona Update: मुंबईत गुरुवारी रुग्णसंख्येत घट! 24 तासात 6 मृत्यूंची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत गुरुवारी रुग्णसंख्येत घट! 24 तासात 6 मृत्यूंची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत गुरुवारी रुग्णसंख्येत घट! 24 तासात 6 मृत्यूंची नोंद

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख कमी होण्याचे नाव घेत नाहीये. बुधवारी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या १६ हजारांवर गेली होती मात्र आज, गुरुवारी मुंबईतील रुग्णसंख्येत 3 हजारांनी घट झाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 13 हजार703 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हिच संख्या 16 हजारांहून अधिक होती. बाधित रुग्णसंख्या आज ३ हजारांनी घटली असली तरी मुंबईतील मृत्यू संख्या काही अंशी वाढली आहे. मुंबईत आज गुरुवारी 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल बुधवारी हिच संख्या २ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या 16 हजार 426 इतकी झाली आहे.

मुंबईत आज 63 हजार 031 कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील 13 हजार 702 चाचाण्या पॉजिटीव्ह आल्या आहेत. 6 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंतचा विचार केला असता मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर हा 1.85 टक्के इतका झाला आहे. मुंबईतील दरदिवशी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला तर ती संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत मागील 24 तासात 20 हजार 849 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 8 लाख 55 हजार 811 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा सध्या 88 टक्के इतका आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे सक्रीय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मुंबईत सध्या 95 हजार 123 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. आज नोंदवण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी केवळ 871 रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यातील 127 रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 6 हजार 410 इतकी आहे.

कोरोना रुग्णसंख्या जशी वाढत आहे तसतसे मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या देखील वाढू लागली होती मात्र आज मुंबईत शून्य सर्कीय कंटेनमेंट झोन आहेत. तर 61 सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – अजून १५ ते २० दिवस शाळा बंदच राहणार!

First Published on: January 13, 2022 7:54 PM
Exit mobile version