Mumbai Corona Update: मुंबईत रविवारी १९,४७४ कोरोनाबाधितांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत रविवारी १९,४७४ कोरोनाबाधितांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा, कोरोनाबाधितांच्या संख्येत घट अन् शून्य मृत्यूची नोंद

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख आज अंशत: खाली आला. मुंबईत आज १९ हजार ४७४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या २० हजारांहून अधिक होती. मुंबईतील मागील काही दिवसांपासून मुंबईत दररोज धडकी भरवणारी रुग्णसंख्या समोर येत आहे. मुंबईत रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी मृत्यूदर हा फार कमी आहे. मुंबईत आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील कोरोना व्हायरसची तीव्रता कमी असली तरी त्याचा पसरण्याचा वेग फार जास्त आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

मुंबईसाठी आज दिलासादायक बाब म्हणजे आज जितके कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत त्याहून अर्धे रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत मागील २४ तासात ८ हजार ६३ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ७ लाख ७८ हजार ११९ इतकी झाली आहे. मुंबईतील सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८५ टक्के इतका आहे.

मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांचा विचार केला असता मुंबईत सध्या १ लाख १७ हजार ४३७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आज एकूण ६८ हजार २४९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील १९ हजार ४७४ चाचण्या या पॉझिटीव्ह आल्या आहेत. इतर जिल्ह्यातून किंवा देशातून मुंबईत दाखल होणाऱ्या नागरिकांची मुंबईतील रेल्वे स्थानकांवरच कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दहशतीमुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले. त्याचप्रमाणे सेल्फ कोव्हिड टेस्ट किटची मागणी देखील वाढली आहे.

मुंबईत रुग्णसंख्या जसजशी वाढत आहे तसतशी मुंबईतील कंटेनमेंटची संख्या देखील वाढत आहे. मुंबईत सध्या १७ सक्रीय कंटेनमेंट झोन आहेत. तर १२३ सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – Maharashtra Mini Lockdown: ठाकरे सरकारने काढले सुधारित आदेश; जिम, ब्युटी पार्लर्सबाबत नवे नियम काय?

First Published on: January 9, 2022 8:45 PM
Exit mobile version