Mumbai Corona Update: मुंबईत शनिवारी २ हजार ९८२ कोरोना रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत शनिवारी २ हजार ९८२ कोरोना रुग्णांची नोंद

Mumbai Corona virus Update 3,671 new covid-19 positive patients registered in mumbai today

मुंबईत आज २ हजार ९८२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज मुंबईत १ हजार ७८० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज मुंबईत ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २१ हजार ३३५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईचा विचार केला तर मुंबईत आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ८७९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ३ लाख २५ हजार ६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ५७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९१ टक्के इतका आहे. १३ मार्च ते १९ मार्च पर्यंत मुंबईतील कोरोना वाढीचा दर हा ०.६१ टक्के इतका आहे. आतापर्यंत मुंबईत ३६ लाख ८६ हजार ८८३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या ३४ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ३०२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईसह राज्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात आज २७ हजार १२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आज १३ हजार ५८८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आज कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना काही लक्षणे आढळल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी असे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे त्याचबरोबर आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


हेही वाचा – Covinवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता वाट पाहू नका, जवळच्या रुग्णालयात जाऊन लस घेण्याचे पालिकेचे आवाहन

First Published on: March 20, 2021 9:13 PM
Exit mobile version