Mumbai Corona Update : मुंबईत आज 26 नव्या रुग्णांची नोंद, तर सक्रिय रुग्णांची संख्या घटली

Mumbai Corona Update : मुंबईत आज  26 नव्या रुग्णांची नोंद, तर सक्रिय रुग्णांची संख्या घटली

Mumbai Corona Update : मुंबईत आज 26 नव्या रुग्णांची नोंद, तर सक्रिय रुग्णांची संख्या घटली

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून दररोज नोंदवण्यात येणाऱ्या बाधित रुग्णांच्या संख्येत चढ उतार होताना दिसत आहे. मुंबईत आज 26 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आजची संख्या दोनने कमी झाली आहे. मुंबईत आज एकूण 9 हजार 968 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ २६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी केवळ 5 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात जाण्याची गरज भासली. तर 1 रुग्णाला ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे.

मुंबईतील मृत्यूदर हा शून्यच असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकूण 16 हजार 693 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु मागील 15 दिवसांपासून मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

त्याचप्रमाणे मुंबईत आजच्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली. मागील 24 तासात मुंबईत एकूण 49 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत एकूण 1 लाख 37 हजार 762 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. मुंबईचा सध्याच्या रिकव्हरी रेट आणि पॉझिटिव्हीटी रेट स्थिर आहे. रिकव्हरी रेट 98 टक्के असून पॉझिटिव्हीटी रेट 0.003 टक्के इतका आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात 156 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 269 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे आजही राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. राज्यात कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनाचे फक्त 99 नवे रुग्ण आढळून आले होते, तर 180 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.


हेही वाचा – Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 156 नवे रुग्ण, 269 कोरोनामुक्त

First Published on: March 22, 2022 9:42 PM
Exit mobile version