Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णांचा टप्पा ३ हजारांच्या पार, आज १० जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णांचा टप्पा ३ हजारांच्या पार, आज १० जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत आज ३ हजार २६० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज मुंबईत १ हजार ३२३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. असे असले तरी आज मुंबईत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ३ लाख ६५ हजार ९१४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ लाख २८ हजार ३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. तर आतापर्यंत मुंबईत ११ हजार ५९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २५ हजार ३७२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असले तरी मुंबईत करोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९० टक्के इतका आहे. १५ मार्च ते २१ मार्च पर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.६९ टक्के इतका झाला आहे. २१ मार्च २०२१ पर्यंत मुंबईत ३७ लाख ३० हजार ४५० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या ४० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर मुंबईत ३१६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

दादर, धारावी, माहीममध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने पुढील दोन दिवसात लॉकडाऊन करावा लागेल असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.  त्याचप्रमाणे राज्याचा विचार केला असता मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पुढील काळात मोठा धोका उद्भवू नये यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – One Year Of Janata Curfew: जनता कर्फ्यूला १ वर्ष पूर्ण!

 

 

 

 

 

First Published on: March 22, 2021 8:13 PM
Exit mobile version