Mumbai Corona Update : मुंबईत गुरुवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढली तर ८० रुग्ण बरे झाले

Mumbai Corona Update : मुंबईत गुरुवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढली तर ८० रुग्ण बरे झाले

Mumbai Corona Update : मुंबईत गुरुवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढली तर ८० रुग्ण बरे झाले

मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी संख्येत चढ उतार पाहायला मिळतोय. मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवारी, १० मार्च रोजी मुंबईत ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत ही संख्या १०ने वाढली असून काल ५४ बाधितांची नोंद करण्यात आली होती. तर मुंबईत आजही शून्य कोरोनामृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट हा ०.०१ टक्क्यावर आला आहे. त्याचप्रमाणे आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील घटली आहे. मागील २४ तासात मुंबईत एकूण ८० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुपणे घरी परतले आहेत. काल हीच संख्या १०० इतकी होती आज या संख्येत २० ने घट झाली आहे. मुंबईत सध्या रिकव्हरी रेट हा ९८ टक्के इतका आहे त्यामुळे मुंबईकरांना घाबरण्याचे काही कारण नाही.

मागील २४ तासात मुंबईत १३ हजार, ७८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील ६३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून यातील ६ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर १ रुग्णाला ऑक्सिजन बेडची गरज भासली आहे.

मुंबईप्रमाणे आज राज्यातील बाधित रुग्णांमध्ये देखील वाढ झाली. त्याचप्रमाणे दोन दिवसांनी कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू देखील झाला. मागील २४ तासात राज्यात ४५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ४९४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पालिकेच्या अथक प्रयत्नांनी आणि मुंबईकरांनी दिलेल्या साथीने मुंबई कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. मुंबईतील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र मास्क लावणे अजूनही अनिवार्य आहे. मुंबईसह राज्यातील कोरोना आकडेवारीचा उतरता क्रम कायम राहिला तर मुंबईसह राज्य मास्कमुक्त होईल.


हेही वाचा –  Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी मृत्यूसंख्येत वाढ तर ४५२ कोरोनाबाधितांची नोंद

First Published on: March 10, 2022 9:51 PM
Exit mobile version