Mumbai Corona Update: आज गुरुवारी मुंबईच्या रुग्णसंख्येत कमालीची घट, ७ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: आज गुरुवारी मुंबईच्या रुग्णसंख्येत कमालीची घट, ७ जणांचा मृत्यू

मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत आज कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या देखील आज तिनशेने कमी झाली. मुंबईत आज ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल बुधवारी ही संख्या १,१२८ इतकी होती. रुग्णसंख्या कमी होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील रुग्णसंख्या देखील आज तीन हजारांनी खाली आल्याचे पहायला मिळाले. मुंबईत आज नोंद करण्यात आलेल्या बाधित रुग्णांपैकी १०५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील २६ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. मुंबईत आज एकूण ३६,८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील केवळ ८२७ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या.

मागच्या २४ तासात मुंबईतील मृत्यूसंख्या देखील कमी झाली. आज ८ जणांचा कोरोनामुळे जीव गेला.काल ही संख्या १० इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूची संख्या ही १६,६४७ इतकी आहे. मुंबईत २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.११ टक्के असून रिकव्हरी रेट हा ९७ टक्के आहे.

त्याचप्रमाणे मुंबईत आज एकूण १,३६६ रुग्णांनी कोरोनावर मात करुन ते सुखरुप घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी मुंबईचा रिकव्हरी रेट पाहता यात कोणतेही काळजी करण्याचे कारण नाही. तसेच मुंबईतील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील आता आटोक्यात आली असून मुंबईत सध्या ७,६०१ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत सध्या ३सक्रीय सीलबंद इमारती असून कंटेनमेंट झोनची संख्या देखील शून्य आहे.


हेही वाचा –  Maharashtra Corona Update: आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, ओमिक्रॉनचा एकही…

First Published on: February 3, 2022 9:30 PM
Exit mobile version