Mumbai Corona Update: मुंबईत ९२५ कोरोना रुग्णांची नोंद, ३१ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत ९२५ कोरोना रुग्णांची नोंद, ३१ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत १५ हजारांहून अँक्टिव्ह रूग्ण, ६६० नव्या बाधितांची नोंद

मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा रिकव्हरी रेटही ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत गेल्या २ ते ३ दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. मुंबईत आज ९२५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेली बाधितांची संख्या ७ लाख ८ हजार ७ इतकी झाली आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईच्या रुग्णसंख्येत काही अंशी वाढ झाली आहे. मुंबईत काल पर्यंत मृतांचा आकडा कमी झाला होता. आज मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत आज ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १४ हजार ९३८ इतकी झाली आहे. (Mumbai Corona Update: 925 corona patients registered in Mumbai, 31 deaths)


कालपर्यंत मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ५ हजारांवर होती. आज मात्र कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ६३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल हीच संख्या ५ हजार ८६८ इतकी होती. कोरोनामुक्तांच्या संख्येत ४ हजारांनी घट झाली. मुंबई एकीकडे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असली तरी मुंबईच्या आकडेवारीत होणारा चढ उतार मुंबईकरांसाठी धोकादायक ठरु शकतो. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ७४ हजार २९६ इतकी झाली आहे.


मुंबईत आज २४ हजार ७३२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील फक्त ९२५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या मुंबईत असलेल्या अँक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. आजही अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट पहायला मिळाली. त्यामुळे मुंबईत सध्या १६ हजार ५८० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. काल हिच संख्या १७ हजारांहून अधिक होती. मुंबईत २६ मे ते १ जून पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.१४ टक्के इतका झाला आहे. मुंबईतील अँक्टिव्ह कंटेनमेंन झोनची संख्या कमी होऊन ३० वर आली आहे. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १५१ इतकी आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; १५ हजार १६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद 

 

First Published on: June 2, 2021 8:24 PM
Exit mobile version