Mumbai Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट, ३ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

Mumbai Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट, ३ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

Mumbai Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट, ३ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

मुंबईत १० हजारांच्या उंबरठ्यावर गेलेली रुग्णसंख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली. आज मुंबईत २ हजार ४०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. काल हिच संख्या २६ हजारांहून अधिक होती. रुग्णसंख्येसोबतच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. आजही मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक आहे. आज ३ हजार ३७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ६ लाख १३ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९१ टक्के झाला आहे. आज मुंबईत ३२ हजार५९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील २ हजार ४०३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.


मुंबईत २ मे ते ८ मे पर्यंता विचार केला असता मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.४४ टक्के इतका आहे. मुंबईत ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ६ लाख ७६ हजार ४७५ बाधित रुग्णांपैकी १३ हजार ८९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ८९ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. काल हीच संख्या ९३ इतकी होती. तर ५५३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणाच लसीकरण सुरु आहे. लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने सर्व नागरिकांना कोरोना लस सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी वरळीत ड्राईव्ह इन लसीकरणासाठी आणखी ४ लसीकरण सेंटर सुरु करण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ड्राईव्ह इन लसीकरण मोहिमेत नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचेही महापौरांनी सांगितले. आतापर्यंत ३५ लाख ५ हजार ७६१ कोव्हिशील्ड लसीचे तर १ लाख ७५ हजार ३९ कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले असल्याची माहिची महापौरांनी दिली.


हेही वाचा – झोपेतून जागे व्हा ! IMA ची केंद्राच्या लसीकरणावर टीका अन् Lockdown सल्ला

 

First Published on: May 9, 2021 7:30 PM
Exit mobile version